Social Activity
इको फ्रेंडली क्लबला क्रांतीसुर्य उपक्रमशील संस्था पुरस्कार

Solapur  September 07,2019

  

इको फ्रेंडली क्लबला क्रांतीसुर्य उपक्रमशील संस्था पुरस्कार

सोलापूर : सोलापूर शहर जुनी पेंन्शन हक्क संघटन व जैन अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी कृतीशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबला क्रांतीसुर्य उपक्रमशील संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्या रविवारी ८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे जुनी पेंन्शन हक्क एल्गार मेळावा व क्रांतीसुर्य उपक्रमशील संस्था पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे.

विविध मान्यवर संस्था, संघटनांसोबतच इको फ्रेंडली क्लबच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सुदर्शन वऱ्हाडे सर, प्रकाश आळंगे सर आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद..

- इको फ्रेंडली क्लब